सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय दिवसीय नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यावर असून ते सध्या सोलापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला. नुकसानीच्या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.


विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही. मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही.' पुढे बोलताना त्यांनी नुकसानग्रस्त भागातील गावकऱ्यांना आश्वासन दिलं आहे ते म्हणाले की, 'तुम्हाला कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, नाराज करणार नाही. हे तुमचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्व जनतेचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही.'


'झालेल्या नुकसानाबाबत जी काही मदत करायची आहे. ती मदत करण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. सगळीकडे पंचनामे सुरु आहेत. सगळी माहिती घेतली जात आहे. तसचे ही माहिती आम्ही केवळ घेत बसणार नाही तसेच या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. जशी माहिती आमच्याकडे येईल तशी आम्ही मदतीला सुरुवातही करणार आहोत.', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळीराजाला आश्वासन दिलं आहे.


'एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही आपत्ती मोठी आहे. सुदैवाने आज ऊन पडलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता प्राणहानी होता कामा नये. अतिवृष्टी होऊ नये अशी प्रार्थना माझी आहेच. परंतु, जर पाऊस आलाच तर प्राणहानी होता कामा नये. जी मदत करायची आहे, ती मदत करायला सरकार कुठेही मागे राहणार नाही. मदत अद्याप पूर्ण झालेली नाही. आता मदतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच गरज पडली, तर काल शरद पवार बोलल्याप्रमाणे माननिय पंतप्रधानांकडेही आम्ही विनंती करणार आहोत.'


पाहा व्हिडीओ : दोन दिवस पावसाचा इशारा आहे, नुकसानभरपाई तर देऊच, पण सगळ्यांनी सावध राहा : मुख्यमंत्री



'पुरामुळे अनपेक्षितपणे पाण्याचा लोंढा आला. त्यामुळे मनुष्याची प्राणहानी झालेली आहे. प्राणीही वाहून गेले आहेत. आता ही पुररेषा, जवळपास 70 वर्षांनी एवढं पाणी शिरलं होतं. हा धोका लक्षात घेतल्यानंतर पूनर्वसन जे करायचं असेल तर ती पूररेषा लक्षात घेऊन पुन्हा पाऊस पडला, तर जीवीतहानी होता काम नये. आता ऊन पडलं आहे. अतिवृष्टीचा इशारा हा 22, 24 तारखेपर्यंत देण्यात आलेला होता. अजूनही तो आहे. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की, सुरक्षित स्थळी राहा. गाफिल राहू नका, जीव वाचल्यानतंर आपण सर्व गोष्टी करू शकतो.' असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :