महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 01:09 PM (IST)
महाड (रायगड): महाड पूल दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करु अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुर्घटनास्थळी मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी भेट दिली. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. एनडीआरएफच्या टीमची शोधमोहीम जोरदार सुरु आहे. हे शोधकार्य सुरु राहिल. शोधकार्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. ही सगळी घटना पाहता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यासाठी सक्षम अधिकारी नेमण्यात येतील. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्यातील अशाप्रकारच्या पुलांचं ऑडिट करण्यात येईल. ही घटना घडू नये यासाठी काय प्रयत्न केले गेले होते? याचीही माहिती घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. संबंधित बातम्या: