पावसाळी अधिवेशनासाठी 15 जिल्ह्यातले पोलीस सध्या नागपुरात आहेत. पोलिसांसाठी पिकअप व्हॅन, ड्युटीवर असताना अन्नपुरवठा आणि कॉलवर रुग्णवाहिका अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपुरात होत आहे.
अधिवेशन काळातील पोलिसांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलं. शिवाय राज्य सरकारकडून पोलिसांसाठी करण्यात येत असलेल्या उपयायोजनांबद्दलही माहिती दिली.
पोलीस कुटुंबीयांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून नवीन 50 हजार घरांचं बांधकाम सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ :