CM Eknath Shinde on NCP Sharad pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मागील काही दिवसांपासून मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहे.  प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात उपचार घेत होते. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना उद्या रुग्णालयातू डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बीच कँडी रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयातून निघाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली.  


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यापूर्वी एक दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहचले आहेत. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला जाणार आहेत. त्यानंतर ते रुग्णालयात उपचारासाठी माघारी येणार आहेत. त्यानंतर माघारी आल्यानंतर चाचण्या, तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. 


शिर्डीमध्ये शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर होणार आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही रुग्णालयातून थेट शिबिरात जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 'राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा' या शिबिराचा आज पहिला दिवस पार पडला. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. 



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या शिबिराचा आज पहिला दिवस पार पडला. या शिबिरात अनेक मान्यवर वक्त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.   या शिबिरामध्ये थोड्या वेळासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे शरद पवार साहेबांनी उपस्थिती लावली होती.  प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.