मुंबई : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. तर, जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही? मग हा वाद का निर्माण करत आहात?, सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे. शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून, त्याला आपला सपोर्ट होतोय की काय असं चित्र निर्माण होतंय, असे जरांगेंबद्दल बोलतांना शिरसाट म्हणाले.
पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की,"सरकार काम करतंय, मागासवर्गीय आयोग, शिंदे समिती काम करत नाही का? करतंय, पथक तेलंगाणाला जाऊन देखील आले. नोंदी कोणी काढल्या? याच सरकारनं काढल्या आहेत. तलाठ्यापासून सर्व यंत्रणा काम करतंय, तुम्ही याला काम म्हणणार नाही का?, मुळात आपली मागणी काय? सरकारनं त्यासंदर्भात काम सुरु केलंय ना? , नंतर ज्या मागण्या येतायत त्यामुळे कामाचा ट्रॅक चेंज होत आहे. मग सरकारला काम करणं अवघड होतं, असे शिरसाट म्हणाले.
फेब्रुवारीत आरक्षण मिळणार असल्याने मुंबई आंदोलन कशासाठी?
तसेच, इतिहासात पहिलियांदाच असं झालंय मुख्यमंत्र्यांसोबत सगळे जरांगेंना भेटले आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे सरकार काम करतंय. मराठा समाजाला देखील याची जाणीव आहे. कुणालाही दुखवता कामा नये अशी सरकारची भूमिका आहे. फेब्रुवारीत सरकार अधिवेशन घेत आरक्षण जाहीर देखील करणार आहे. मग कशाला पाहिजे हे (मुंबई आंदोलन) सगळं, असे जरांगे म्हणाले. जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही? मग हा वाद का निर्माण करत आहात? सरकार तुमच्याशी बोलायला तयार असल्याचे शिरसाट म्हणाले.
जरांगेंनी संजय राऊतांचे तोंड शेकले पाहिजे
दरम्यान, शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. "तो शेण खाल्लेलं माणूस बोलला काहीतरी, जरांगेंना प्यादं समजता का वैगेर बोलला. जरांगेंनी त्याचं तोंड शेकले पाहिजे. अडीच वर्ष त्यांनी काही केलेलं नाही आणि जरांगेंना प्यादं म्हणता, असे शिरसाट म्हणाले.
लाखो मराठे मुंबईकडे निघाले...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे आज सकाळीच आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात लाखो मराठे देखील पायी दिंडीत सहभागी झाले आहेत. तर, मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना