Uddhav Thackeray Kalaram Mandir visit नाशिक : सध्या अयोध्यानगरीसह संपूर्ण देश रामलल्लाच्या (Ram Mandir) प्रतीक्षेत आहे. राम मंदिर लोकार्पणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज्जांना अयोध्येत (Ayodhya) येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाची (Ram Mandir Inaguration) धूम असताना नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन (Shivsena UBT State level convention) होणार आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक करण्याचा ठाकरे गटाचा मानस असून पदाधिकारी अधिवेशनाची जय्यत तयारी करत आहेत.


ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संभाव्य दौरा नुकताच समोर आला आहे. उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये (Nashik News) 22 जानेवारीला दाखल होणार आहेत. 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले होते. त्याच मंदिरात उद्धव ठाकरे दर्शन घेणार असून ते आरतीही करणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) स्मारकात जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करणार आहेत. 


असा असेल उद्धव ठाकरेंचा संभाव्य दौरा


उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्यानुसार, ते 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता मातोश्रीहून रवाना होणार आहेत. विमानाने त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. 1 वाजता ते ओझरहून भगूरला जाणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन ते सावरकरांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर 2 वाजता भगूरहून रॅडिसन ब्ल्यू  हॉटेलकडे उद्धव ठाकरे रवाना होतील.


22 जानेवारीला घेणार नाशिकला प्रभू श्रीरामाचे दर्शन


सायंकाळी 5.30 वाजता उद्धव ठाकरे काळाराम मंदिराकडे निघणार आहेत. काळाराम मंदिरात दर्शन घेऊन ते  पूजादेखील करणार आहेत. तसेच 6.30 वाजता गोदा घाटावर येऊन गोदावरीची महाआरतीदेखील उद्धव ठाकरे करणार आहेत. 


23 जानेवारीला उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार


दुसऱ्या दिवशी 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने अभिवादन करून ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 10 ते 2 वाजेपर्यंत पक्षाचे प्रमुख वक्ते बोलणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होईल. सायंकाळी 7 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. सुरुवातीला जागरण गोंधळाचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे. नाशिकला उद्धव ठाकरेंची तोफ नक्की कुणावर धडाडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


आणखी वाचा 


Nashik Kalaram Mandir : पंतप्रधान मोदी ते उद्धव ठाकरे नतमस्तक, राजकीयदृष्ट्या महत्व आलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराचा इतिहास काय?