CM Eknath Shinde : आमच्या सरकारनं गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना 44 हजार 278 कोटी रुपयांची मदत केल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करुन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. माझ्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली. पण लंडन दौऱ्यापेक्षा महाराष्ट्राचा दौरा चांगला असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) टीका केली. आम्ही बांधावर गेलो, शेतकऱ्यांशी बोललो. आम्ही घरुन व्हिसीद्वारे बैठका घेत बसलो नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


महायुतीच्या सरकारनं आजपर्यंत शेतकऱ्यांना विक्रमी मदत केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना मदत मागावी लागू नये अशी परिस्थिती निर्माण करणं गरजेचं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे शिंदे म्हणाले. आरोप होताना विरोधकांनी आत्मचिंतन करावं असे मुख्यमंत्री म्हणाले. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे (Farmers) पंचनामे सुरु आहेत. आत्तापर्यंत 32 पैकी 26 जिल्ह्यातील पंचनामे 100 टक्के पूर्ण झाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. शेतकऱ्यांचा मुद्दा हा अधिवेशनापुरता मर्यादीत नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


आम्ही बांधावर गेलो, व्हिसीद्वारे बैठका घेत बसलो नाही


30 जून 2022 आम्ही सत्तेत आलो. शपथ घेतल्यानंतर पहिल्याचं आठवड्यात मी आणि देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला गेलो होतो. आम्ही बांधावर गेलो, शेतकऱ्यांशी बोललो. आम्ही घरुन व्हिसीद्वारे बैठका घेत बसलो नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळं लंडन दौऱ्यापेक्षा महाराष्ट्राचा दौरा चांगला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


एक रुपयात पीक विमा घेणाऱ्यांच्या संख्येत 177 टक्क्यांची वाढ


एक रुपयात पीक विमा घेणाऱ्यांच्या संख्येत 177 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही केवळ घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारकडचा पैसा हा जनतेचा आहे. त्यामुळं त्यांना मदत मिळाली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले. राजकारणासाठी अनेक विषय आहे. एनडीआरएफपेक्षा वाढीव दरानं सरकारनं मदत केली आहे. 1 हजार 217 कोटी रुपयांचा अग्रीम पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. आपल्या सरकारनं कांद्याची बँक तयार केली आहे. शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


CM Eknath Shinde : सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, अंबादास दानवेंचा आमच्याकडे प्रवेश झाल्याचे जाहीर करा; प्रविण दरेकर खोचक टोल्यात म्हणाले, मग आम्हाला..!