CM Eknath Shinde Diwali With Police at Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांनी आज कारगिलमध्ये जगातील अत्यंत कठीण युद्धभूमीत सैन्यातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांचं अनुकरण केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या गडात शिरून पोलिसांसोबत दिवाळी (Diwali Celebration)साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली (CM Eknath Shinde Gadchiroli tour) जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड तालुक्यातील दोडराज पोलीस मदत केंद्रात पोहोचणार आहे.


भामरागड तालुका म्हटलं की नक्षलवाद्यांचा गड आणि नेहमी ह्या भागात नक्षली कारवाया घडत असतात. भामरागड तालुक्यातील अशाच नक्षल प्रभावित पोलीस मदत केंद्र दोडराजला मुख्यमंत्री येणार आहेत. दोडराज पोलीस मदत केंद्र हे छत्तीसगड ला जाणाऱ्या भामरागड- लाहेरी मार्गावर आहे आणि ह्या संपूर्ण भागात नक्षलवाद्यांच्या नेहमी घडामोडी घडत असतात.


काही वर्षांआधी दोडराज पोलीस मदत केंद्रापासून (Dodaraj Police Help Center) अवघ्या 3 ते 4 किलोमीटरवर मेडपल्ली जवळील पामुलगौतम नदीवर पुलाचे बांधकाम सुरू असताना पोलीस पथक नदी पार करत असताना नक्षलवाद्यानी भुसुरुंग स्फोट घडवून पोलीस वाहन उडवले होते. त्या घटनेत अनेक पोलीस जवान शहीद झाले होते.


आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे थेट नक्षलवाद्यांच्या गडात जाऊन पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. भामरागड तालुक्यातील एक पोलीस मदत केंद्र आहे ते म्हणजे दोडराज पोलीस मदत केंद्र. हे छत्तीसगडला जाणाऱ्या भामरागड- लाहेरी मार्गावर आहे. या संपूर्ण भागात नक्षल्यांच्या घडामोडी नेहमी घडत असतात. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधीच्या ठाकरे सरकारच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यावेळी देखील ते नियमितपणे गडचिरोली दौरा करायचे. आता दिवाळी साजरी करण्यासाठी ते गडचिरोलीला येत आहेत. या निमित्ताने सुरक्षेचा देखील तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. 


ही बातमी देखील वाचा- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण