नागपूर: राज्यातल्या पोलिसांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या घरांसाठी गृह विभागाकडून स्वस्त दरात कर्ज देण्यात येईल तसंच वाढीव एफएसआयही देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
प्रधानमंत्री आवास योजनेसह केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या आवास योजनेच्या माध्यमातून सेवानिवृत्त पोलिसांना घरे बांधून देण्यासाठी नियोजन करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी राज्याचा गृह विभाग स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देईल. नागपुरात पोलिसांसाठी बनणाऱ्या 280 घरांच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते.
दरम्यान, याच समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोलिसांची चांगलीच कानउघाडणी केली. शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी ठेचून काढा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असं त्यांनी सांगितलं.