Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांना नैराश्य आलं असल्याने विविध प्रकारचे वक्तव्य करत आहेत. त्यांना दररोज स्वप्ने पडत आहेत. मात्र, त्यांचा आमदारांशी संपर्क तुटला होता. उद्धव ठाकरेंकडे खोक्याची कमी आहे का? खोक्याचा विषय नसून तेथील व्यवस्थेमुळे आमदार हैराण झाले होते. त्यामुळे राजकारणात एवढी मोठी रिस्क कोणीच घेत नाही. आपण खोके दिला असाल आणि का करत असाल तर राजकीय आयुष्य संपून जातं. त्यावेळी सर्व लोक एकत्रच होते, त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कशी आणि कधी फुटली? याबाबत भाष्य केले. 

अपमान सहन न झाल्याने एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की तेथील (शिवसेना) व्यवस्थेमुळे आमदार वैतागले होते. त्यावेळी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाला कोणत्या पद्धतीने मत द्यायचं याची चर्चा सुरू होती. मात्र, एकनाथ शिंदे गेटनेते असताना सुद्धा त्यांना बाहेर बसवण्यात आलं होतं आणि त्याचवेळी सल्लागार माणूस कोणाला कसं मत द्यायचं हे समजावून सांगत होता. इतका मोठा अपमान सहन न झाल्याने त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गटनेत्यावर इतका विश्वास नसेल तर थांबून काय करायचं? गटनेत्यालाच बाहेर बसवण्यात आले आणि वीस पंचवीस वर्षाचा मुलगा कोणाला मते द्यायची हे समजावून सांगत होता. त्यामुळे एकनाथ शिंदे अपमानाचा बदला घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटलं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी केव्हा माहिती दिली? अशी विचारणा केली असतात फडणवीस यांनी सांगितलं की, त्यांनी (एकनाथ शिंदे) महाराष्ट्र बॉर्डरमध्ये बाहेर गेल्यानंतर मी गेलो असल्याचे म्हणाले.  

मला हलक्यात घेऊ नका हे कोणासाठी?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी सातत्याने मला हलक्यात घेऊ नका असा गर्भित इशारा सुद्धा दिला आहे. याबाबत हा सल्ला कोणाला आहे? अशी विचारणा केली असता  फडणवीस यांनी हा सल्ला उद्धव ठाकरे यांना असून आपल्याला नसल्याचा दावा केला. ते अजूनही ठाकरेंना टांगा पलटी केल्याचे सांगत हलक्यात घेऊ नका म्हणून सांगत असतात, असे फडणवीस म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या