Sushma Andhare On Sanjay Shirsat: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीतील (Mahayuti) मंत्र्यांना कडक तंबी दिल्यानंतरही सरकारमधल्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधानं काही केल्या थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat)  यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्लकाष्ठ सरकारच्या मागं लागण्याची चिन्ह आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी आले असता यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, याच मुद्द्यवरून शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीकास्त्र डागत मंत्री संजय शिरसाटांना खडे बोला सुनावले आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मंत्री संजय शिरसाटांच्या राजीनाम्यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

निव्वळ 5 वर्षात 25 पट संपत्ती, वादग्रस्त ठरल्यानंतर विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार. भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्याच बेडरूममधले व्हिडिओ व्हायरल. आता आपल्या बापाचा माल थोडीच आहे सरकारचा पैसा आहे लुटा.. हा बेतालपणा फडणवीसजी, वाह्या शिरसाटचा राजीनामा कधी होणार? अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. एक्स या समाज माध्यमांवर त्यांनी हि प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

Continues below advertisement

मंत्री संजय सिरसाट यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी पराचा कावळा केला- अमोल मिटकरी

दुसरीकडे याच मुद्दयांवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया देत भाष्य केलंय. यावेळी ते म्हणाले कि, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्या अकोल्यातील वक्तव्याचा माध्यमांनी पराचा कावळा केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय. आपण त्या व्यासपीठावर होतो. मात्र, संजय शिरसाटांच्या शिवसेना स्टाईल वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा संदर्भ दाखविल्यााचा आरोप त्यांनी केलाय.

दरम्यान, अकोल्यातील याच कार्यक्रमात स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाटांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. मिटकरी तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतोय. मात्र, तू जास्त बोलू नकोस नाहीतर तुझेही आमच्यासारखे हाल होतील असा सल्ला शिरसाटांनी मिटकरींना दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या