कल्याणमध्येही लवकरच मेट्रो, मुख्यमंत्र्यांचे नागपुरात संकेत
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2016 07:21 AM (IST)
नागपूर : मुंबई, नागपूर आणि पुण्यानंतर आता कल्याणमध्येही मेट्रो धावणार आहे. नागपुरातील कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत. वेळ आल्यावर कल्याण मेट्रोची घोषणा करेन, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीवासियांची उत्सुकता ताणून धरली आहे. दुसरीकडे पुणे मेट्रोची उभारणी नागपूर मेट्रो कंपनीकडून करण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूर मेट्रोसाठी चीनच्या सीआरसी कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. त्या करारानुसार सीआरसी कंपनी रेल्वे उपकरण निर्मितीचा कारखाना नागपुरात उभारणं अपेक्षित आहे.