जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, राजौरी भागातील गोळीबारात भारताचा एक जवान शहीद


---------------------

कोल्हापूर : एसटी गँगच्या 8 गुंडांना मोक्का अंतर्गत अटक, राजरामपुरी पोलिसांची कारवाई, उद्या पुण्यातील मोक्का कोर्टात हजर करणार
---------------------

गोपीनाथ मुंडे अपघाती मृत्यू प्रकरण : आरोपी ड्रायव्हरविरोधात खटला चालणार, निर्दोष मुक्तता करण्यास दिल्ली सेशन कोर्टाचा नकार

---------------------

1 आगामी काळात कल्याणमध्येही मेट्रो धावणार, नागपुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे संकेत, वेळ आल्यावर घोषणा करणार असल्याची माहिती

--------------

२ राजसत्ता संपुष्टात येऊ लागल्यानं फडणवीसांकडून धर्मसत्तेचा आधार, नरेंद्र महाराजांच्या दरबारातील उपस्थितीवर विरोधकांची तोफ, अंनिसकडूनही निषेध

-----------------

३ ठाणे आणि चिपळूणमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा, तर काल कोल्हापुरातील क्रांती मोर्चाला मराठा तरुणांची रस्त्यावर गर्दी

-----------------

४ मुंबई मेट्रोखाली तरूणाने केलेल्या आत्महत्या सीसीटीव्हीमध्ये कैद, १८ सप्टेंबरला साकीनाका मेट्रो स्टेशनवर केलेली तरूणाने आत्महत्या

--------------

५ आदित्य ठाकरेंच्या केजी टू पीजी मोर्चावरुन युतीत नवं वादळ, पालिकेच्या तोंडावर आदित्यला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न, तावडेंची जोरदार टीका

-----------------

6 वाराणसीत राजघाट पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 24 जण ठार तर १० जण जखमी, बाबा जय गुरूदेव यांच्या शोभायात्रेदरम्यान दुर्घटना

-----------------

7 ब्रिक्स परिषदेचा पहिला दिवस भारताचा, रशियासोबत महत्त्वाच्या 16 करारांवर स्वाक्षऱ्या, रशियाकडून भारताला मिळणार अद्ययावत मिसाईल तंत्रज्ञान

-----------------

८ बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर सुरू झालेल्या काश्मिरमधील बंदचा आज १०० वा दिवस, १०० दिवसांमध्ये ९१ लोकांचा मृत्यू

-----------

९ आजपासून भारत आणि न्युझीलंडमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरूवात, धर्मशाळेत रंगणार पहिला सामना

----------------

एबीपी माझा वेब टीम