राज्यात 72 हजार जणांना रोजगार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 28 Mar 2018 10:45 PM (IST)
येत्या दोन वर्षात राज्य सरकारकडून रिक्तं पदांची भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील तरुणांना खुशखबर दिली आहे. राज्यात तब्बल 72 हजार जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या दोन वर्षात राज्य सरकारकडून रिक्तं पदांची भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे 2019 पर्यंत 72 हजार जणांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. दोन टप्प्यांमध्ये 72 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. निम्मी पदं पहिल्या टप्प्यात भरली जातील, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पदं भरली जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.