Share Market : आज सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 460 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 142 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.80 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,060 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.83 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,102 वर पोहोचला आहे. 


आज 1265 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर -2035 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 117 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक, रिअॅलिटी यासह अनेक क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घट झाली आहे. BSE मिडकॅप 0.81  आणि स्मॉलकॅपमध्ये 0.58 टक्क्यांची घसरण झाली आहे. 


शुक्रवारी शेअर बाजारात Axis Bank, Coal India, Adani Ports, Power Grid आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  HDFC Life, Tata Consumer Products, Kotak Mahindra Bank, Sun Pharma आणि HDFC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • HDFC Life- 1.93

  • TATA Cons. Prod- 1.49

  • Kotak Mahindra- 1.42

  • HDFC Bank- 0.97

  • Sun Pharma- 0.83


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Axis Bank- 6.57

  • Coal India- 3.89

  • Adani Ports- 3.46

  • Power Grid Corp- 3.33

  • Bajaj Auto- 2.73