नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाबाबत सक्रिय विचार सुरु असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली आहे. लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून यासंबंधी प्रस्ताव सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांना मिळाला आहे.
'मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव भाषातज्ज्ञांसमोर मांडण्यात आला आहे. संबंधित समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली असून त्याबाबतच्या शिफारसींवर विचार सुरु आहे' असं महेश शर्मा म्हणाले. मद्रास हायकोर्टातील काही प्रलंबित याचिकांमुळे हा प्रस्ताव मागे पडल्याचं शर्मांनी मान्य केलं.
सध्या तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम आणि ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. सन 1500 ते 2000 या कालावधीत भाषेचा नोंद इतिहास असणं अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असतं. त्याचप्रमाणे प्राचीन साहित्य हे भाषांतरित नसून मूळ भाषेतील असल्याचा निकष पूर्ण केल्यास भाषेला अभिजात दर्जा मिळतो.
मराठी भाषेला 'अभिजात दर्जा' देण्याचा प्रस्ताव विचाराधीन : केंद्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jan 2018 08:52 AM (IST)
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव भाषातज्ज्ञांसमोर मांडण्यात आला आहे. संबंधित समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली असून त्याबाबतच्या शिफारसींवर विचार सुरु आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -