मुंबई : गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने मिळून जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील मणिबेली, मांडवा, गमन, प्रकाशा, सारंगखेडा, तोरणमाळ, उषा पॉईंट आदी पर्यटनस्थळांचे सर्किट करावे, असा प्रस्ताव राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी गुजरात सरकारसमोर ठेवला आहे.
नर्मदा काठी असलेल्या गमन या आदिवासी गावात लवकरच आदिवासी ग्रामच्या धर्तीवर रिसॉर्ट उभारून गमन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान मोटार बोट सेवाही सुरू करण्याच्या सूचना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
गुरुवारी आणि शुक्रवारी मंत्री रावल यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी नर्मदा सरोवर सर्किट हाऊसमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात सरकारमधील अधिकाऱ्यांशी रावल यांची बैठक झाली.
स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे नर्मदा काठच्या गावांना प्रगतीचे नवे दालन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना आणि आदिवासी गावांना व्हावा. आदिवासी तरुणांना किमान कौशल्य कार्यक्रम अंतर्गत हॉस्पिटॅलिटी, पर्यटन रोजगार संबंधी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी इच्छा रावल यांनी व्यक्त केली आहे.
गमन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हाऊस बोट सेवा, बोट रेस्टॉरंट, ट्रायबल व्हिलेज रिसॉर्ट उभे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जागची ते मणिबेली रस्ते कामाची सुरुवात लवकरच केली जाणार आहे. महाराष्ट्र सदनच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ रिसॉर्ट उभे करता यावे यासाठी गुजरात सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी. परिसरात रस्त्यांचे जाळे उभे करावे, दूरसंचार सुविधा उभ्या कराव्या, अशा सूचना रावल यांनी या बैठकीत केल्या.
स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात पर्यटनस्थळांचे 'सर्किट' होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Dec 2018 11:33 AM (IST)
स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे नर्मदा काठच्या गावांना प्रगतीचे नवे दालन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना आणि आदिवासी गावांना व्हावा. आदिवासी तरुणांना किमान कौशल्य कार्यक्रम अंतर्गत हॉस्पिटॅलिटी, पर्यटन रोजगार संबंधी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी इच्छा रावल यांनी व्यक्त केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -