'स्व. माननीय बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील. त्यांना कुत्रे आवडतात. उद्धव ठाकरेंनी पण तीच परंपरा चालू ठेवली आहे…रामदास कदमच्या रुपात! सतत भुकत असतो..त्याला हे माहित नाही.. भुकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!” असं झोंबणारं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’ अशी रामदास कदम यांनी केली होती. अपेक्षेप्रमाणे या टीकेला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर देताना रामदास कदमांची तुलना थेट कुत्र्यासोबत केली आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम
शुक्रवारी रत्नागिरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांच्यावर रामदास कदम यांनी केली होती. ”या राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपामध्ये आलेत. त्यांच्यासाठी आता फक्त रामदास आठवलेंचा पक्ष बाकी राहिलाय. राणे बघावं तेव्हा मातोश्रीवर टीका करतात. मात्र, आपली तेवढी औकात आहे का, हे त्यांनी तपासून बघावं. याच शिवसेनेच्या जोरावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यामुळे मातोश्रीवर बोलण्याची त्यांची औकात आहे का? नारायण राणेंसारख्या व्यक्तीला ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ ही उपमादेखील कमी पडेल. नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही”. असं कदम म्हणाले होते.