मुंबई: निलेश राणे यांच्या मारहाणीनंतर आज चिपळूणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवनात सावंत यांनी आज आपल्या समर्थकांसह भगवा हातात घेतला.

 

एप्रिल महिन्यात माजी खासदार निलेश राणे यांनी आयोजित केलेल्या मराठा आरक्षणाच्या मेळाव्याला संदीप सावंत गैरहजर राहिले होते. त्यामुळं संतापलेल्या नितेश यांनी रात्री घरी जाऊन संदीप सावंत यांना उचलून आणलं. आणि गाडीत घालून मुंबईपर्यंत त्यांना मारहाण केली असा आरोप संदीप सावंत यांनी केला होता.

 

इतकंच नव्हे तर अंधेरीत अज्ञात ठिकाणी संदीप सावंत यांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. अखेर संदीप सावंत यांच्या पत्नीनं राणे कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर संदीप सावंत यांची सुटका करण्यात आली होती.

संबंधित बातम्या


निलेश राणेंवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा



संदीप आमचा कार्यकर्ता, आम्ही आमचं बघून घेऊ : नारायण राणे



संदीप सावंतांना कुठलीही मारहाण नाही, नारायण राणेंचा दावा