सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचागणेशोत्सवाचा मुहूर्त टळून आता नवरात्रोत्सवाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाल्याची माहिती  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान वाहतुकीला पूर्णपणे सज्ज झालेला आहे. परवाच्या दिवशी मी दिल्लीला होतो. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एव्हिएशन सेक्रेटरी, डिजिसीएचे चेअरमन आणि हवाई वाहतूक करणारी अलायन्स कंपनीचे या सर्वांशी संपर्क साधला असता येत्या 7 ऑक्टोबरला चिपी विमातळावरून विमान वाहतुकीस सज्ज असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. 


7 ऑक्टोबर नवरात्र उत्सवातील पहिला दिवस या दिवसापासून सिंधुदुर्गातून विमान वाहतूक सज्ज आहे. त्या अनुषंगाने त्यांनी त्याची तयारी चालू करण्याची विनंती हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहून विनंती केल्याची खासदार विनायक राऊत यांनी  केली  आहे.  या नवरात्र उत्सवातील पहिला दिवस सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टीने सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल. विमान वाहतूक सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्र सरकारकडे तशी परवानगी मागावी अशी विनंती विनायक राऊत यांनी केलेली आहे. 


सिंधुदुर्गात विमानतळ सुरु झाल्यानं तळकोकणात जाणाऱ्या प्रवासी आणि चाकरमान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये कुडाळजवळील या विमानतळासाठी 520 कोटींचा खर्च करण्यात आला. चिपी विमानतळामुळे देशातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यला पर्यटनाला चालना मिळेल.


सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाला अजूनही मुहूर्त पक्का झालेला नाही. सत्ताधाऱ्यानी अनेक वेळा तारखा देऊनही अध्याप विमानतळाला मुहूर्त सापडलेला नाही. आता तर खाजगी विकासकाला चिपी विमानतळाचे काम देण्यावरून राजकारण सुरू झालेलं पहायला मिळालं.  त्यामुळे कोकण वासीयांच स्वप्न सत्यात केव्हा येईल ते माहित नाही मात्र त्यावरून कोकणात राजकारण मात्र जोरात सुरुच आहे.


संबंधित बातम्या :


कोकणचे सम्राट म्हणवणाऱ्यांनी चिपी विमानतळाची वाट लावली, नाव न घेता विनायक राऊतांचा नारायण राणेंवर प्रहार