China Corona Cases : चीनमध्ये कोरोनाचा कहर झाला असल्याच्या बातम्या आपण काही दिवसांपासून वाचत आहोत. मात्र चीनमधील कोरोनाचं उगमस्थान मानल्या जाणाऱ्या वुहानमध्ये परिस्थिती अत्यंत नॉर्मल असून कुठलीही पॅनिक व्हावी अशी परिस्थिती नाही, हे एबीपी माझानं केलेल्या एका लाईव्हमधून समोर आलं आहे. लातूरचा असलेला एमबीबीएसचा विद्यार्थी आशिष घुमरेनं चीनमधील परिस्थिती दाखवली. आशिष घुमरे याच्याशी एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी संवाद साधला. तिथल्या रस्त्यावर फिरत आशिषने स्थिती लाईव्ह दाखवली आहे. लोक काळजी घेत आहेत, परंतु चिंताजनक स्थिती नाही. तिथल्या मॉलमध्ये मुले विदाऊट मास्क स्नूकर खेळत आहेत. दुकाने व्यवस्थित सुरू आहेत. मेडिकल शॉपमधली स्थिती देखील पॅनिक व्हावं अशी नाही.  


यावेळी आशिष म्हणाला की, वुहानमध्ये सगळं नॉर्मल झालं आहे. सगळी दुकानं सुरु आहेत.लोकांना ये-जा करण्यासाठी बंधनं नाहीत किंवा कुठल्याही गाईडलाईन्स नाहीत. पहिल्यासारखं नॉर्मल झालंय असं आपण म्हणू शकतो. कोविडच्या केसेस काही प्रमाणात आहेत मात्र स्थिती गंभीर नाही. 


वुहान हे मुंबईसारखं एक मोठं शहर आहे. वुहानमध्ये सध्या तरी कुठलीही पॅनिक स्थिती नाही. सगळी दुकानं उघडी आहेत, असं आशिषनं सांगितलं. शिवाय आशिषनं काही शॉपिंग मॉल आणि हॉटेल्समधली स्थिती देखील दाखवली. सगळी हॉटेल्स आणि दुकानं उघडी आहेत. काही लोकांनी तर मास्क घातलेला देखील दिसत नाही, असं आशिषनं सांगितलं. 


आशिषनं यावेळी कॅमेऱ्यातून शॉपिंग मॉल आणि दुकानांची स्थिती देखील दाखवली. चीनमध्ये कुठंही लोकं रस्त्यावर उतरलेली नाहीत. तसेच सरकारविरोधात रोषाची परिस्थिती देखील नाही, असंही सांगितलं. 


आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना बाहेर कुठं जायचं असेल तर सांगून जायचं असं विद्यापीठानं सांगितलं असल्याचं आशिषनं सांगितलं. आशिष आठ ते दहा दिवसांपूर्वी भारतातून चीनला पोहोचला. त्याच्या तीन टेस्ट झाल्याचं देखील त्यानं सांगितलं. संपूर्ण शहरभर नॉर्मल परिस्थिती असल्याचं आशिषनं सांगितलं. 


जीम, सुपरमॉलसह सर्व महत्वाच्या गोष्टी सुरळीतपणे सुरु आहेत. मी स्वत: देखील जीम करतो, असंही आशिषनं सांगितलं. जीममध्ये काही तरुण मास्कविना स्नूकर वगेरे खेळत असल्याचं आशिषनं लाईव्हमध्ये दाखवलं आहे. आशिषनं सांगितलं की, वुहानमध्ये कुठंही लॉकडाऊन किंवा प्रवासावर बंधनं नाहीत.


या लाईव्हमध्ये एका चीनच्या विद्यार्थ्यानं सांगितलं की, वुहानमध्ये पॅनिक व्हावं अशी स्थिती नाही. सगळं काही व्यवस्थित आहे. 


हा व्हिडीओ नक्की पाहा