मुख्यमंत्र्यांची नववर्षाची सुरुवात शनी दर्शनानं!
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2018 08:34 AM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाची सुरुवात शनी दर्शनानं केली आहे. राजकीय साडेसातीची विघ्न टाळण्यासाठी मुख्यमंत्री शनीच्या चरणी लीन झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाची सुरुवात शनी दर्शनानं केली आहे. राजकीय साडेसातीची विघ्न टाळण्यासाठी मुख्यमंत्री शनीच्या चरणी लीन झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या वर्षभरात काही दुर्घटनांमधून थोडक्यात बचावल्यानं आणि हितशत्रूंचं विघ्न टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शनी दर्शन घेतल्याची चर्चा आहे. काल (सोमवार) सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी शनीला तेल अभिषेक घालून पुजा केली आणि यावेळी शनी दर्शनाला आलेल्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचीही भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला जामखेडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचं भूमीपूजन केलं. कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडून नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी विरोधकांवर टीकाही केली. ‘सरकारचा शेतीतील गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न आहे. जलयुक्तनं राज्यात तीन वर्षांत 11 हजाराहून अधिक गावं दुष्काळमुक्त झाली. तर 2019 पर्यंत पंचवीस हजारापर्यंत गावं दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ‘गेल्या सरकारनं पंधरा वर्षात शेतकऱ्यांना जेवढी मदत केली नाही तेवढी मदत आम्ही केवळ तीन वर्षांत केली.’ असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. तर शेतकऱ्याची मुलं शेती ऐवजी शिपाई बनण्याचा विचार करतायत माञ कृषी महाविद्यालयातून शेतीचं तंञज्ञान शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत गेल्यास ते शेती समृद्ध करतील आणि त्यांच्या विचार बदलतील, असंही मुख्यमंञ्यांनी म्हटलंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कृषी महाविद्यालयावरुन मंत्री राम शिंदे आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यातील वादावर ही भाष्य केलं. ‘महाविद्यालयाचं काम सुरु झाल्यावर काही लोक कोर्टात गेले. मात्र, महाविद्यालयाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी असल्यानं अडचण आणू नका, कोर्टबाजी करु नका. असं मी सांगितलं. मात्र, या कार्यक्रमाकडे बबनराव पाचपुते यांनी पाठ फिरवली. संबंधित बातम्या : आमच्या हातून चूक होऊ शकते, पण बेईमानी नाही : मुख्यमंत्री सर्वांना हक्काचं घर मिळण्यासाठी दोन विधेयकं मंजूर : मुख्यमंत्री ... तर पंकजा मुंडेंची चौकशी करु : मुख्यमंत्री विनाकारण नागपूरला टार्गेट करु नका : मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलटच जबाबदार : एएआयबी जो महाराष्ट्राचं भलं करतो, त्याला काहीही होणार नाही : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री हेलिकॉप्टर उडालं, 1 मिनिटात कोसळलं, नेमकं काय घडलं? लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं?