स्मार्ट बुलेटिन | 21 जुलै 2019 | रविवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2019 09:34 AM (IST)
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. राज्यभरातल्या अनेक भागात पावसाची हजेरी, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सांगलीत मुसळधार, शेतकऱ्यांना दिलासा 2. मुसळधार पावसात वीज कोसळून धुळ्यात दोन बालकांचा तर भिवंडीत एका महिलेचा मृत्यू, चार जण गंभीर 3. आसाम आणि बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर, दीडशेहुन अधिक लोकांचा मृत्यू, पंजाबमध्येही सात जिल्ह्यातही स्थिती बिकट 4. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची आज मुंबईत बैठक, जे पी नड्डा, मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती, विधानसभेच्या तोंडावर खलबतं होणार 5. बॅलेट पेपरच्या मागणीसाठी मनसे निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा, कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ न देण्याचं राज ठाकरेंपुढे आव्हान 6. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाचरणी कोट्यवधीचं दान, यंदा 4 कोटी 40 लाखांची देणगी, तर दानपेटीत अमेरिका, युक्रेन, सिंगापूरचंही चलन 7. भेंडीबाजार क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पासाठी महापालिकेचा भूखंड देण्यास विरोध, तोट्याचा सौदा असल्याने पालिकेचा निर्णय 8. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी, शिवसेनेची मागणी 5. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास, आज दुपारी अंत्यसंस्कार 6. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज निवड, संघनिवडीआधीच धोनीची माघार, ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता