अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम तोफखाना पोलीस ठाण्यात हजेरीला आलाच नाही. छिंदमने रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात हजेरी लावणे आवश्यक होते. मात्र त्याने इतर पोलीस ठाण्यात हजेरी लावली असण्याची शक्यता आहे.

छिंदमला जामीन मंजूर करताना न्यायालयाने दर रविवारी 12 ते 2 या वेळेत तोफखाना पोलीस ठाण्यात हजेरी देण्यास बजावलं होतं. मात्र जीविताला धोका असल्यानं अज्ञातस्थळी असलेल्या छिंदमनं स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावल्याची  शक्यता आहे.

छिंदमनं कोणत्या पोलीस ठाण्यात किती वाजता हजेरी लावली, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी छिंदमने कोणत्या पोलीस ठाण्यात हजेरी दिली, याबाबत अद्याप माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

इतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची परवानगी छिंदमनं मागितली होती. या प्रकरणी पोलिसांनी छिंदमच्या जीविताला धोका असल्यानं कायदा सुव्यवस्था प्रश्न असल्याचं सांगितलं. त्यानुसार  छिंदमनं बाहेरच्या पोलीस ठाण्यात हजेरी दिल्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :


छिंदम हजेरीसाठी पोलीस ठाण्यात आलाच नाही!