नागपूर : इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी अशी मागणी विधानसभेत केल्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये येत बराच गोंधळ केला.
भाजप आमदार हाळवणकरांची नेमकी मागणी काय?
महाराजांचा जन्म 8 एप्रिल 1630 रोजी झाला आहे. याला काही संशोधकांच्या संशोधनाचा आधार आहे. त्यामुळे यावर सरकारने एक संशोधकांची समिती नेमून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी.’ असे . अशी त्यांनी मागणी केली. राज्यात दोनदा जयंती साजरी होण्याऐवजी एकदा साजरी केली जावी असा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला.
विरोधकांचा गोंधळ
त्यांच्या या मागणीवर विरोधकांनी बराच गोंधळ घातला. ‘महाराजांच्या जयंतीबाबत विसंगत बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही.’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतली.
याबाबत वाद निर्माण करता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. यावर वावगे बोलणाऱ्याला राज्यात नीट जगता येणार नाही. त्यामुळे याविषयी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी. अशी मागणी विरोधकांनी केली.
तसेच हाळवणकर यांचे म्हणणे रेकॉर्डवरुन काढण्याची जोरदार मागणीही विरोधकांनी केली. मात्र, सदस्याने केवळ माहिती दिली आहे. यामुळे यात काहीही असंसदीय नसल्याचे सांगून अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांची मागणी धुडकावून लावली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेच्या मुद्यावरुन सभागृहात गोंधळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Dec 2017 01:33 PM (IST)
इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी अशी मागणी विधानसभेत केल्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये येत बराच गोंधळ केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -