Chhatrapati Sambhajinagar: विशाळगड हिंसाचारप्रकरणी (Vishalgad Violence) आता एमआयएम आक्रमक झाला असून 19 जुलै रोजी राज्यातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात धडकणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी फेसबुकवरून कार्यकर्त्यांना तशा सूचना केल्या आहेत.


दरम्यान सोमवारी इम्तियाज जलील यांनी विशाळगड हिंसाचारप्रकरणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. शाहू महाराजांचे वंशज हिंसेचा नेतृत्व करतात असं म्हणत खासदार शाहू छत्रपती यांच्यावर जोरदार टीका केली.


येत्या 19 जुलैला कोल्हापुरात मोर्चा


विशाळगड हिंसाचारप्रकरणी एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून येत्या 19 जुलैला कोल्हापुरात धार्मिक स्थळी झालेल्या तोडफोडीच्या विरोधात एमआयएमचे राज्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून सांगितले आहे.


<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?height=476&href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fimtiaz.jaleel%2Fvideos%2F985384986362093%2F&show_text=false&width=268&t=0" width="268" height="476" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen="true" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share" allowFullScreen="true"></iframe>


विशाळगड प्रकरणावर इम्तियाज जलील म्हणाले..


आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेलात. आणि आता मुस्लिम समाजाची अशी परतफेड करत आहात असे जलील म्हणाले. मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ करण्यात आला. कोण हिंसा करतंय?शाहू महाराजांचे वंशज नेतृत्व करतात. असे म्हणत त्यांनी  खडे बोल सुनावले. आम्ही तुमचा आदर करतो मात्र असल्या हिंसक घटनांना तुम्ही पुढाकार घेता  दुर्दैवी आहे, जे पुस्तक महाराज तुम्ही मला दिले ते तुम्ही आता  वाचा, आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेले, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला.


 हे घडत असताना कोल्हापूर पोलीस आपली ड्युटी करत नसून बघ्याची भूमिका घेत होते असा आरोप त्यांनी केला. अतिक्रमण काढण्याचे काही नियम असतात, पण हा गुंडाराज चालला आहे का असा खडा सवाल त्यांनी केला.


इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना खडे सवाल!


 "मी कोल्हापुरातील मौलाना, धार्मिक संघटनांना प्रश्न विचारतो. ते सेक्युलर पक्षांना मतदान करायचं म्हणून रस्त्यावर आले होते. मुस्लिमांनी दोन-दोन तास ऊनात उभं राहून ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं." असं इम्तियाज जलील यांनी संभाजीराजेंना सुनावलंय.


 या सर्वाचं नेतृत्व कोण करत होतं? जे स्वत:ला शाहू महाराजांचे वंशज म्हणवतात. मी संभाजी महाराजांना मी एक प्रश्न विचारतो की, तुम्ही मला शाहू महाराजांचे पुस्तकं दिले होते. मी आपल्याला होत जोडून विनंती करतो संभाजी महाराज, ते पुस्तक एकदा वाचा. संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) कोण होते? शाहू महाराज कोण होते? त्या शाहू महाराजांचे (Shahu Maharaj) आपण वंशज असाल तर कुठे छ. शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही?"


हेही वाचा:


Imtiyaz Jaleel on Vishalgad Issue : कुठे छ. शाहू महाराज आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही, इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना खडे सवाल!