Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे चांगलेच आक्रमक झाले असून. रविवारी मनोज जरांगेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनतर ते सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र पोलिसांनी संचारबंदी लागू केल्याने त्यांना पुन्हा आंतरवाली सराटीत परतावे लागले. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आपल्याला जरांगेंच्या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला. 


छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलण्यास वेळ नाही. सध्या अधिवेशन सुरु आहे मला तिकडे पाहू द्या. मी सध्या दोन जुन्या नाटकांचा अभ्यास करत आहे. त्यांची जुळवा जुळव मी करत आहे.  जवळ जवळ नवीन स्क्रिप्टवर आहे. एक डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे गृह खात्याला जेव्हा जाग येते आणि दुसरे म्हणजे सीमेवरून परत जा. त्यामुळे मला या मुद्द्यावर बोलायला वेळ नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. 


एवढी शक्ती उपोषणकर्त्याला कशी आली? 


दरम्यान, रविवारी छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना टोला लगावला होता. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांचं पितळ उघडं पडलं जात आहे. त्यांनी केलेल्या गुप्त बैठका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाला त्यांनी जे काही गुमराह केलंय, त्यामुळे आता त्यांचेच लोक बोलायला लागलेले आहेत. कदाचित त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल आणि त्यामुळे ते असे काही तरी बोलत आहेत.  तुम्ही अगोदर तब्येत सांभाळा. मला मोठे आश्चर्य वाटते की, उपोषण करत असतानाही त्यांचा आवाज फार खणखणीत आणि मोठा आहे. हे कसे काय आहे आणि ते 10 लोकांना सुद्धा ऐकत नव्हते. एवढी शक्ती उपोषणकर्त्याला कशी आली, हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे आश्चर्य आहे,  असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.


शांतता राखण्याचे जरांगेंचे आवाहन


मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने मराठा समाजाने शांतता ठेवण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहेत. आंतरवाली सराटीमध्ये बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तसेच, मी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार होतो आणि त्यांनी मला आमंत्रण दिले होते. मात्र, आता संचारबंदी लावून त्यांनी दारे बंद केली आहे. त्यामुळे आमचा विजय झाला असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.  


आणखी वाचा 


आशिष शेलारांकडून संजय राऊतांचा 'पत्रकार पोपटलाल' म्हणून उल्लेख; म्हणाले, "दिल्ली भाजपने..."