Chhagan bhujbal In Majha katta : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यंत्री छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर विशेष मुलाखत दिली. 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी खास संवाद साधला आहे. मागील पाच दशकात देशातील आणि राज्यातील राजकारण आणि समाजकारण छगन भुजबळ यांनी खूप जवळून पाहिले आहे. ज्या पक्षातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली, त्या शिवसेनाच्या सध्याच्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालेय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आहे. पण तीस वर्षांपूर्वी 1991साली शिवसेना नेतृत्वाला असेच आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं होतं. शिवसेना ते राष्ट्रवादी व्हाया काँग्रेस या प्रवासात छगन भुजबळ यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले आहेत. नगरसेवक ते गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं छगन भुजबळ यांनी भूषवली आहेत. छगन भुजबळ यांच्यातील राजकीय नेता घडवणारी शिवसेना सध्या सर्वात कठीण काळातून जात आहे. तर छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादी पक्षासमोरही मोठी आव्हानं आहेत. या सर्वांविषय छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर उत्तरं दिली आहेत.
राजकीय आयुष्यात कोणत्या गोष्टीची खंत वाटते? शिवसेना सोडलेली की बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा घेतलेला निर्णय?
शिवसेना सोडण्यामागे काही कारणं होती. वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा 1985 विधानसभेत आमदार होतो. तर विधानपरिषदेवर मनोहर जोशी आमदार होते. मंडल आयोग जाहीर झालाच पाहिजे अशा आम्ही घोषणा करायचो. त्यावेळी व्हीपी सिंह यांनी मंडळ आयोगाची घोषणा केली. त्याला बाळासाहेबांचा विरोध सुरु झाला. त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आमच्यामध्ये विरोधाभास जाणवू लागला. पोटाला जात नसते, त्यामुळे जातीवरुन आरक्षण मिळता
कामा नये, असे बाळासाहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्याचवेळी मी भटक्या विमुक्त जातींचा मोर्चा निघाला होता, त्यांच्याबरोबर आरक्षण मिळावं म्हणून मी आंदोलनात होतो.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा शिवाजी पार्कवर भाषणामध्ये आम्ही श्रीक्रृष्ण आयोगाची स्थापना करु असी घोषणा केली होती. नेमकं मी गृहमंत्री झालो. त्यावेळी सर्व फाईल्स बंद केल्या होत्या. अचानक गृहमंत्रालयाकडून एक फाईल आली, त्यामध्ये सर्व पोलिसांचे रिपोर्ट्स होते, गुन्हा नोंदवायला हवा..आता मी केलं नाही तर लोकं म्हणणार श्रीक्रृष्ण आयोगाची अमंलबजावणी केली नाही. सर्व केसेस संपवल्या होत्या, तरीही केस कशी राहिली. त्यांचेच सरकार असताना फाईल्स राहिली कशी...? त्यानंतर मी सही केली. बाळासाहेबांना अटक झाली. आयुक्तांना सांगितलं की, त्यांना तुरुंगात वैगरे घेऊन जाऊ नका, जामीन मागितला तर देऊन टाका.. असे सांगितलं होतं. जामीन नाही मिळाला तर काय करायच... तर मातोश्री हेच जेल आहे असे म्हणायचं अन् त्यांना तिथेच ठेवायचं. असं ठरवलं होतं. तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडे जेवढा प्रसिद्ध झाला नाही तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला. काँग्रेस प्रवेशावर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘लखोबा लोखंडे’ असा उल्लेख केला.
नथुराम यांच्याबद्दलची भूमिका? त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
त्यावेळीच मी माझी भूमिक स्पष्ट केली होती. माझ्या तोंडामध्ये चुकीचे शब्द टाकले गेले होते. नथुरामाचे पुतळे उभा करावे, असे मी म्हटलोच नव्हतो.
बाळासाहेबांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा आणि माघार, नेमकं काय घडलं होतं?
डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेत माझं नाव 'सामना'मध्ये छापून आलं. मात्र मला न्यायालयाने निर्दोष सोडलं. त्यामुळे मी बाळासाहेबांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यावेळी सामनामधील माझ्या अब्रुनुकसानीच्या अग्रलेख प्रकरणी बाळासाहेब यांना अटक होणार होती. मात्र मी कोर्टात जाऊन केस मागे घेतली. या नंतर मला बाळासाहेबांनी कुटुंबीयांसोबत घरी बोलवले. मी गेलो आणि जेवण केलं. कौटुंबिक एकत्र
राहिलो. यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर परत कधीच टीका केली नाही आणि मी देखील केली नाही.
शिवसेनेतून बंड कसा केला...?
त्यावेळी आम्ही 18 जण शिवसेनेतून बाहेर पडलो होते. 54 पैकी 18 जणांनी आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण 10 दिवसानंतर आमच्यामधील 6
जणांनी पुन्हा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पुन्हा एक तृतांश आमदार बाहेर पडले होते. पुढच्या निवडणुकीत आमच्यातील दोन तीन निवडून आले.
विधानसभेत अद्यापही रेकॉर्ड आहे. आम्हाला सोडलं नसते, त्यामुळे आम्ही बाहेरच होतो. आमचा शपथविधीच नागपूरला झाला. मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर तेथून जो काचाचा पडल्या होत्या त्या माझगावच्या घरापर्यंत होत्या.बाहेरही कुठेही निघालो तर आडवे यायचे दगड वैगरे फेकायचे... काँग्रेसवाले
काही वाचवायला येत नव्हते. हळू हलू पुढे गेलो... ती परिस्थिती शिवसेनेत जाऊ शकत होतात, पण बाहेर नाही....
तुमचा आवडता मुख्यमंत्री कोणता?
शरद पवार आणि विलासराव देशमुख