Chhagan Bhujbal : बीडमधील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता आणि राज्याच्या गुप्तचर खात्याचे ते अपयश असल्याचा दावा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal On Beed Violence) केला. जयदत्त क्षीरसागर हे फक्त ओबीसी समाजाचे असल्याने त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला असल्याचंही ते म्हणाले. तसेच ओबीसीमधून मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) तीव्र विरोध असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला. 


छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? 


मी बीड आणि माजलगाव गेलो होतो. मी किंवा माझ्या पक्षाने आरक्षणाला विरोध केला नाही.आम्ही हे म्हणतो आहे की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता द्या. ओबीसीमध्ये छोट्या जाती आहेत  त्यात मराठ्यांना काही मिळणार नाही. जी आमची भूमिका तीच शिंदे, शरद पवार, फडणवीस यांची आहे.हे आंदोलन सुरू झालं त्यात प्रचंड नासधूस केली. सुभाष राऊत यांच्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त नुकसान झालं. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्यानंतर त्यावेळी मी सांगितले होते की हॉटेलला संरक्षण द्या. सोळंके यांच्या घरातील हल्ल्यावेळी कोयते,पेट्रोल बॉम्ब सोबत होते. 


जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्या घरातील हल्ल्यात घरचे सापडले तर वाचले नसते. प्रत्येकाला सांकेतिक नंबर दिला होता. हे ठरवून होतं, अचानक घडलं नव्हतं. या नेत्याला हा नंबर दिला होता. सोळंके बोलतात हे खरं आहे. आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतील असं नाही, जे प्रकाश सोळंके म्हणाले त्यात गैर काय? पोलीस हतबल का झाले याची चौकशी व्हावी. पोलिसांना माहिती नव्हती का, त्यांच्याकडे शस्त्र होतं, काठ्या होत्या, थोडा तरी प्रतिकार करायला हवा होता.


त्या न्यायमूर्तींकडून न्याय कसा मिळेल? 


छगन भुजबळ म्हणाले की, "जरांगे यांच्या उपोषणाच्या वेळी लाठीचार्ज झाला. त्यामध्ये पोलीस जखमी झाले त्यांची बाजू पुढे आले नाही. 70 पोलीस जखमी झाल्यावर काय करणार? त्यांच्या आमच्या सरकारने बदल्या केल्या. पोलिसांवर कारवाई झाली म्हणून काय व्हायचे तर होऊ द्या हे त्यांनी ठरवलं असावं. पोलिसांवर हल्ला झाला त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडायला माजी न्यायमूर्ती जात असतील तर आम्हाला काय न्याय मिळणार? मंत्री जातात ते ठीक पण न्यायमूर्ती त्यांना सर म्हणतात, त्यांच्या पाया पडतात?"


कुणब्यांना आरक्षण द्या, सरकसकट मराठ्यांना नको


तेलंगणा निवडणूक आहे म्हणून पुरावे मिळत नाही म्हणता, मग 2 दिवसात कसे मिळाले आणि 13 हजार म्हणता? सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं. आरक्षण संपवण्याचा घाट सुरु आहे. मंत्रालयापासून खालीपर्यंत सगळीकडे हे सुरु आहे. आवाज उठवणं गरजेचं आहे. कुणबींना आरक्षण मिळावं, पण सरसकट मराठ्यांना नको. तुम्ही मतांसाठी हे करत असाल तर ओबीसींची मतं तुम्हाला नको का? मराठे म्हणतात भुजबळांना मतदान देऊ नका, मग ओबीसींनीही तसा विचार केला तर? ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय यात अनेकांचा समावेश. मतांसाठी सर्व सुरू असेल तर तुम्हाला ओबीसींची मतं नको का? हे वातावरण असंच केले तर तो व्यक्ती असेल तर ओबीसी ओबीसी समाजाला समजत नाही असं समजू नका. जातीय गणना करा.