Chhagan Bhujbal on Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका केली. आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असे भुजबळ म्हणाले. यावेळी बोलताना भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर देखील टीका केली. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला अशी टीका भुजबळ यांनी केली. विखे पाटील कारण नसताना जरांगेकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे की तुमच्या लोकांना आवरा असेही भुजबळ म्हणाले.
दुहेरी लढाई लढणार आहे. एक न्यायालय आणि दुसरी रस्त्यावरची लढाई
हिशोब करा राज्यात 54 टक्के ओबीसी,13 टक्के दलीत, 7 टक्के आदिवासी, 3 टक्के ब्राह्मण त्यानंतर मुस्लिम आणि जे शिल्लक राहतात तो मराठा समाज असे भुजबळ म्हणाले. दुहेरी लढाई लढणार आहे. एक न्यायालय आणि दुसरी रस्त्यावरची लढाई असे भुजबळ म्हणाले. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो नाही. इथं फक्त ओबीसीसाठी लढा देत आहोत. पक्षाच काम आल्यावर आम्ही त्यासाठी लढू असे भुजबळ म्हणाले. जे जे ओबीसीच्या मुळावर उठले असतील त्यांना आडवे करा असा इशारा भुजबळ यांनी दिला.
मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती
मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत, हा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे, सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलं आहे की, मराठा समाज हा सामाजिकदृष्टया मागास नाही असे भुजबळ म्हणाले. भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, ओबीसीच्या ताकतीवर तुम्हाला 145 आमदार मिळाले आहेत. त्यामुळं यावर मार्ग काढा असे भुजबळ म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांच्यावरही भुजबळांची टीका
भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील टीका केली. नगरला आले नाहीत, पंढरपूरला आले नाहीत, बीडला आले नाहीत, कुठला दबाव तुमच्यावर आहे. तुम्ही सांगितलं होतं तुमच्याबरोबर आहे. मग तुम्ही का नाही आलात ? असा सवाल भुजबळांनी केला. यावेळी भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ दाखवला. यामध्ये विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील ायंची आंदोलस्थळी भेट घेतल्याचे दिसत आहे.