जालना: एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असतानाच, दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यातील वाद आता आणखीनच टोकाला पोहचला आहे. जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 14 ऑक्टोबरच्या सभेसाठी 7 कोटी रुपये कोठून आले असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. तर, आता भुजबळ यांच्या टीकेला जरांगे यांनी देखील उत्तर दिले आहेत. "भुजबळ म्हणतात 7 कोटी कोठून आले. त्यांना कोणी सांगितले 7 कोटी जमा झाल्याच. त्याला (भुजबळांना) पाहिजे का दोन एक हजार रुपये डिझेल टाकायला,” असे प्रत्युत्तर जरांगे यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता यावरून मराठा-OBC वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली जात असतांना, याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. दरम्यान, आज झालेल्या समता परिषदेच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावेळी बोलतांना भुजबळ म्हटले की, 100 एकरात शेती साफ करुन मैदान करताय, 7 कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यांच्या याच टीकेला मनोज जरांगे यांनी देखील उत्तर दिले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, “सात कोटी जमा केल्याचे त्यांना कोणी सांगितले. त्याला (भुजबळ) पाहिजे का दोन एक हजार डीझेल टाकायला. भुजबळ आता काहीही बोलयला लागले आहे. त्यांना काही झालं आहे का? सरकारने त्यांना लवकर रुग्णालयात नेले पाहिजे. एवढा मोठा माणूस असे काहीही कसा बोलू शकतो. मी केलेल्या एवढ्या दौऱ्यात एकही मराठा म्हणाला मी 50 रुपये घेतले, तर तो म्हणेल ते करायला मी तयार आहे.
भुजबळ यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे...
ओबीसीमधून आरक्षण देणार नाही असे भुजबळ म्हणाले असता, त्यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, आम्ही ओबीसीमधूनचं आहोत. त्यामुळे आम्ही आरक्षण ओबीसीमधूनचं घेणार आहे. देणार नाही म्हणजे त्यांची मक्तेदारी थोडी आहे. आरक्षण हे सरकराने दिलेली सुविधा आहे. ओबीसी 54 टक्के असल्याचं सांगणाऱ्या भुजबळ यांनी आम्हाला हिशोब सांगण्याची काय गरज आहे. तुम्ही तुमचं पाहा आम्ही आमचं पाहणार आहे. भुजबळ हे घटनेच्या पदावर बसले असून, त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी भुजबळ यांना समज दिली पाहिजे. आम्ही बोलायला कमी नाही, पण एक वयस्कर व्यक्ती असल्याने आम्ही आदर करत आहे. त्यांना मराठ्यांनी मोठं केले असून, आज भुजबळ मराठ्यांच्या विरोधातचं बोलत आहे, असं जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: