रुग्णालयातून घरी परतलेल्या भुजबळांना पत्रकारांनी पहिली प्रतिक्रिया विचारल्यानंतर, ते म्हणाले, “झाले मोकळे आकाश, अशी भावना आहे.”
शिवसेनेबद्दल नेमकं काय म्हणाले?
“पडत्या काळात शिवसेनेने शब्दांचा का होईना, आधार दिला. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलो आहे. त्यामुळे काळजी असणारच. ऋणानुबंध असतातच.” असे छगन भुजबळ म्हणाले.
भुजबळांची तब्येत कशी आहे?
तसेच, “गेली साडेतीन महिने आजारपणामुळे त्रस्त होतो. अजूनही आजारपणातून पूर्णपणे बाहेर पडलो नाही. मात्र डॉक्टरांना विनंती केल्यानंतर त्यांनी जास्त त्रास घेऊ नका, असं सांगितलं आहे. परत हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागेल कदाचित. काही शस्त्रक्रिया कराव्या लागतील, त्यातून बरं वाटलं तर शंभर टक्के कार्यक्रमाला हजर राहणार.”, असे भुजबळांनी स्वत:च्या तब्येतीबाबत सांगितले.
जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन कुणाचा?
जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा आला, असे भुजबळांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ यात्रेच्या समारोप सभेला जाणार का?
"प्रकृती ठीक झाली तर 10 जूनच्या सभेला जाईन. मला परत एकदा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यातून बरं वाटलं, तर शंभर टक्के मी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजर राहीन", असे छगन भुजबळ म्हणाले.
‘महाराष्ट्र सदन सुंदर, बनानेवाला अंदर’
“सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तुम्ही ते शोधायला हवं. महाराष्ट्र सदन आज सगळ्यांच्या पसंतीला उतरलं आहे. त्याचा मला आनंद आहे. भाजपच्या खासदारानं सांगितलं होतं, महाराष्ट्र सदन सुंदर आणि बनानेवाला अंदर.”, असे भुजबळांनी महाराष्ट्र सदन प्रकरणावर भाष्य केले.
पाहा संपूर्ण पत्रकार परिषद :