परभणीतून अटक झालेल्या आयसिस संशयितांविरोधात आरोपपत्र
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2016 06:42 PM (IST)
नांदेड : परभणी जिल्ह्यातून आयसिसमध्ये सहभागी संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. पाच आरोपींविरुद्ध नांदेड न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. 86 व्या दिवशी चार्जशीट दाखल झाल्याची ही पहिलीच घटना आहे. आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून परभणीतून 4 आरोपींना जेरबंद करण्यात आलं होतं, तर एक संशयित फरार आहे. आरोपींविरोधात 3 हजार 632 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. स्फोटकं बाळगणे, बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा अशा आरोपांसाठी दोषारोपपत्र नोंदवण्यात आलं आहे. नासेर चाउस, मोहम्मद शहीद खान, इकबाल अहमद, मोहम्मद रैसोद्दीन हे परभणीचे चार आरोपी अटकेत आहेत, तर पाचवा आरोपी सिरीयात फरार आहे.