अहमदनगर : कोपर्डी बलात्कारप्रकरणी अखेर 86 दिवसांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल झालं आहे. आरोपपत्रात प्रमुख आरोपी म्हणून जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांची नावं आहेत. त्यांच्यावर कलम 302 अर्थात हत्या आणि कलम 376 (अ) म्हणजेच बलात्कार या कलमा अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.


कोपर्डी बलात्कारप्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र कोपर्डी बलात्काराला घटनेला 86 दिवस उलटूनही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नव्हतं.

नियमाप्रमाणे जर एखाद्या गुन्ह्यात 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झालं नाही, तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते.

आरोपपत्र दाखल होत नसल्यानं विरोधी पक्ष आणि मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळेच स्वत: मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेतली होती.


कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार

कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलैला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या नराधमांना अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या

कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !

कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार 

नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर

मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई