कोल्हापूर: हटके आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात येत्या 15 ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घोंघावणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वेगळाच निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून, मराठा मोर्चाचं निवेदन स्वीकारणार आहेत.
यापूर्वीच्या मोर्चात सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निवदेनं स्वीकारली. मात्र त्याला छेद देत, स्वत: पालकमंत्री निवेदन स्वीकारणार आहेत.
कोल्हापूरमध्ये 15 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चा नियोजित आहे. या मोर्चालाही विक्रमी उपस्थिती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या मोर्चामध्ये कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.