चंद्रपूरच्या मूलमध्ये भीषण अपघात, भरधाव स्कॉर्पिओची उभ्या ट्रकला धडक, सहा जणांचा मृत्यू
सारंग पांडे, एबीपी माझा | 19 Feb 2020 11:37 PM (IST)
अपघात इतका गंभीर होता की जवळपास अर्धी स्कार्पिओ गाडी ट्रकच्या मागील बाजूमध्ये घुसली आहे. अद्याप मृतक आणि जखमींची नावं कळू शकलेली नाहीत. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे आज रात्री झालेल्या भीषण अपघातात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या अपघातात तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातातील जखमींना मूल येथील रुग्णालयात दाखल केले आहे. प्राथमिक माहितीनुसार भरधाव स्कॉर्पिओ गाडीने मार्गावर बंद असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातातील मृतक गोंदिया येथे देवदर्शनाला गेले होते, अशी माहिती आहे. हे सर्व लोक चंद्रपुरातील असल्याची माहिती आहे. गोंदिया येथे देवदर्शनाहून येताना हा अपघात झाला झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले असून जखमींना मूल येथील रुग्णालयात दाखल केले आहे. अपघात इतका गंभीर होता की जवळपास अर्धी स्कार्पिओ गाडी ट्रकच्या मागील बाजूमध्ये घुसली आहे. अद्याप मृतक आणि जखमींची नावं कळू शकलेली नाहीत. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.