Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Election 2024) काँग्रेसची (Congress) उमेदवारी मिळवल्यापासून प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगतान दिसत आहे. आशातच आता यवतमाळचे भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे (MLA Dr. Sandeep Dhurve) यांनी प्रतिभा धानोरकर यांना थेट आव्हान देत घणाघाती टीका केली आहे.


चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातील दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी खासदार निधीतून यवतमाळच्या आर्णी, घाटंजी, पांढरकवडा येथे केलेली एक कोटींची कामे दाखविल्यास आपण आपली अर्धी मिशी कापू, असे थेट आव्हान आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी प्रतिभा धानोरकरांना दिले आहे. तसेच काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्या महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. अशी बोचरी टीकाही धुर्वे यांनी केलीय. चंद्रपूर येथे आयोजित भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 


..... तर मी आपली अर्धी मिशी कापेल


मी आपल्यातून निघून गेलेल्या लोकांबद्दल बोलत नाही. मात्र विकासकाम काय असतं हे दाखवून देणारे सुधीर मुनगंटीवार हे आता पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांचा मोठा विजय होईल, असा विश्वासही आम्हाला आहे. त्यामुळे जातीपाती न पाळता केवळ विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे. तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळाली असल्याने हे खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील लोकांचे भाग्य असून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, अशी मतदारांची भावना असल्याचेही आमदार डॉ. संदीप धुर्वे म्हणाले. 


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी खासदार निधीतून यवतमाळच्या आर्णी, घाटंजी पांढरकवडा येथे केलेली एक कोटींची कामे केल्याचे दाखवा, मी आपली अर्धी मिशी कापेल, असे माझे थेट आव्हान आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात भाजपच्या वतीने सुधीर मुनगंटीवार सारखा विकासपुरुष या मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रचंड मेहनत करून त्यांना मोठ्या मताधिक्याने आगामी निवडणुकीमध्ये विजयी करण्याचा संकल्प आपण प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन देखील आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी बोलताना केलंय. त्यामुळे आमदार धुर्वे यांनी केलेले टीकेला काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर या कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या