Madha Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलीय. यामध्ये सध्या माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) जोरदार चर्चा सुरु आहे. माढ्यातून भाजपने (BJP) पुन्हा एका रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिलीय. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कोण उमेदवार असणार हे अद्याप समजलं नाही. शरद पवार (Sharad Pawar)  गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि शेकापचे अनिकेत देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज कै. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh)  यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय झालं? याबाबतची माहिती पाहुयात.


येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेऊ


शरद पवारांनी आज माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.  माढा लोकसभा मतदारसंघातू निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छूक आहे. त्यामुळं मी शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केल्याची माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली. सध्या माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात रोष आहे. तर महाविकास आघाडीला चांगले वातावरण असल्याचे अनिकेत देशमुख म्हणाले. येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेऊ असे साहेबांनी सांगितल्याचे अनिकेत देशमुखांनी सांगितलं. 


मोहीते पाटील आणि आमचे संबंध चांगले 


दरम्यान, माढा लोकसभा मतादरसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे, लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. यावर बोलताना अनिकेत देशमुख म्हणाले की, मोहीते पाटील आणि आमचे संबंध चांगले आहेत. ते सध्या महाविकास आघाडीत नाहीत. त्यामुळं मी जास्त बोलू शकत नाही असे अनिकेत देशमुख म्हणाले. येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेऊ असे साहेबांनी सांगितल्याचे अनिकेत देशमुखांनी सांगितलं. 


शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार मोहिते पाटील की देशमुख?


गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबतची माहिती खुद्दे जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितली होती. मात्र, अद्याप कोणाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. तर दुसरीकडे अनिक देशमुखांनी शरद पवार यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळं आता शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार मोहिते पाटील की देशमुख अशी चर्चा सुरु झालीय.


महत्वाच्या बातम्या:


माढ्यात महायुतीला धक्का, तुतारीला बळ; कोकाटेंचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश