चंद्रपूरमध्ये शिक्षिकेची शाळेतच आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2017 11:35 AM (IST)
प्रातिनिधिक फोटो
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये शिक्षिकेने शाळेतच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील भद्रावती शहरातील मॅकरुन शाळेत ही घटना घडली. ललिता दासरीका (वय 37 वर्ष) असं मृत शिक्षिकेचं नाव आहे. दासरीका यांनी शाळेच्या गच्चीवर गळफास लावून आयुष्य संपवलं. मॅकरुन ही शहरातील प्रतिष्ठित आणि नावजलेली शाळा आहे. सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास शाळा उघडण्याच्यावेळी ही घटना समोर आली. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. परंतु वैयक्तिक कारणामुळे शिक्षेकेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या घटनेचा पोलिस तपास सुरु आहे.