चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी एका कार्यक्रमात आपल्या आमदार पत्नीला हिटलरची उपमा दिली. ती देखील आमदार पत्नीच्या उपस्थितीमध्ये आणि जेलमधील कैद्यांशी संवाद साधताना. खासदार धानोरकर यांच्या या विनोदी टोल्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. कैद्यांच्या मनोरंजनासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा कारागृहाला दोन टीव्ही संच भेट दिले. 


कारागृहातील कैद्यांशी संवाद साधतांना "चंद्रपुरात स्थायिक व्हावं अशी माझी इच्छा आहे. तसं झालं तर तुम्हाला महिन्यातून किमान एकदा भेटता येईल. तुमच्या समस्या समजून घेता येईल. मात्र हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आमची हिटलर मॅडम आम्हाला परवानगी देईल" अशी कोटी करत धानोरकर यांनी "बायको घरी हिटलरच असते" असं म्हणत फटकेबाजी केली. 


जेलमधील कैद्यांना उद्देशून खासदार धानोरकर म्हणाले की, ज्याची परिस्थिती त्यांनाच ठाऊक असते, तुम्ही इकडे आहात (कारागृहात) बरे आहात. घरी असते तर तुमचीही परिस्थिती फार वेगळी नसती. जिसको बिवी है उसको पता है. जिसको नहीं है, उसका ठिक है, असे म्हणतात एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले की, कारागृहात जेलर आहेत. घरी गेल्यावर ते जेलर नसतात. तिथले जेलर कुणी वेगळेच असतात असे म्हणत जेलर साहेबांची देखील फिरकी धानोरकर यांनी घेतली.


इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha