Chandrapur News : चंद्रपूर शहरातून अपघाताची  (Accident News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात (Chandrapur News)  ट्रक आणि  कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघातात 4 जणांचा  जागीच मृत्यू झालाय, तर  एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर-भोयगाव-चंद्रपूर मार्गावरील लखमापूर येथे आज पाहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला या भरधाव कारने जबर धडक दिली आहे. तर या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया करत असून गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


अपघातात 4 जणांचा  जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी


हाती आलेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारच्या पहाटेच्या सुमारास काही तरुण आपल्या अर्टिगा कारने चंद्रपूरवरून जिवतीच्या  दिशेने जात होते. दरम्यान कार गडचांदूर-भोयगाव-चंद्रपूर मार्गावरील लखमापूर येथे आली असता, इथं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला या भरधाव अर्टिगा कार ने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात 4 जणांचा  जागीच मृत्यू झालाय, तर  एकजण गंभीर जखमी आहे. सुरज गव्हाले (वय 22, रा. शेणगाव) सुनील किजगीर (वय 27 वर्ष रा. शेणगाव) आकाश पेंदोर (वय 22 वर्ष रा. पाटण), श्रेयश पाटील (वय 22 वर्ष  रा. टाटाकोहोड) अशी या चौघांचा जागीच मृत्यू झालेल्यांची नावे आहे. तर अजय गायकवाड (रा. कोलामगुडा) हा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटणेचा तपास सध्या गडचांदूर पोलीस करत आहेत.


रेल्वे रूळ ओलांडत असताना मालगाडीच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू


रेल्वे रूळ ओलांडत असताना मालगाडीच्या धडकेत एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. गोंदिया-चंद्रपूर रेल्वे लाईनवर गडचिरोली जिल्ह्यातील वडसा विभागातील गांधीनगर जवळ सकाळच्या सुमारास मालगाडी ने वाघिणीला धडक दिलीय. यात वाघिण गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळतात गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या तिन्ही जिल्ह्यातील वनविभागाची चमु घटनास्थळी दाखल झाली. मात्र, जखमी वाघिणीने जंगलात धूम ठोकली. वनविभागाच्या चमुने वाघिणीचा रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला मात्र, या दरम्यानच वाघिणीचा मृत्यू झाला.


इतर महत्वाच्या बातम्या