Deputy CM Devendra Fadnavis : अखेर गुरुवारी राज्यात शिंदेशाहीला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन राज्यात तर्क वितर्क सुरु झाले आहेत. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला आपण मंत्रिमंडळात नसणार, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर भाजप (BJP) हायकमानकडून ऐनवेळी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यांनी शपथ देखील घेतली. त्यानंतर भाजपमधील अंतर्गत कलहाबाबातच्या चर्चा सुरु झाल्या. यावर आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेय. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, सामान्य हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आनंद दिघेंचे विचार जपणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत होते पण हिंदुत्वासाठी आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. प्रशासनाची आवश्यकता असल्याने एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आग्रह केला. त्यानंतर पक्ष श्रेष्ठींशी बोलले, आम्ही निर्णय पक्ष श्रेष्ठीना विचारतो. एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्रिपद स्विकारले. 



देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झालेले पहिलं उदाहरण नाही. प्रशासनाची आवश्यकता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत सहभागी व्हावं लागले, असे पाटील म्हणाले. पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व असतो. जे आपल्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मोठे मन लागते. ते मोठे मन देवेंद्र फडणवीस यांनी दाखवल्याचं पाटील यांनी सांगितले.  


देवेंद्र फडणवीस अजूनही नाराज  ?
फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे तसेच मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी फडणवीस यांना विनंती करत मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देवेंद्र फडणीस यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी दोनदा फोन केल्याचे बोलण्यात आले. दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणीस मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होत असल्याचे सांगितले. त्यामुळे या सत्ता नाट्यानंतर भाजपमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले. दरम्यान, भाजप कार्यालयाच्या बाहेर जो फलक लावण्यात आला आहे त्यावर अमित शहा यांचाच फोटो नाही. त्यामुळेही चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणीस यांचे दिल्लीतून पंख कापण्यात आले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियामध्ये देवेंद्र फडणीस यांना का रोखण्यात आलं? याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिली नव्हती. त्या अनुषंगानेच त्यांची प्रत्येक वाटचाल सुरू होती. मात्र, आता यामध्ये भाजप सरकार स्थापन होऊनही मुख्यमंत्रि पदापासून दूर ठेवण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या 
Maharashtra Government formation : ते पुन्हा आले, पण उपमुख्यमंत्री म्हणून; मोदी, शहांच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी
maharashtra government formation : बेसावध राहू नका! राज ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांना सल्लावजा शुभेच्छा
...त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो; राज ठाकरेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा