सांगली : भाजपाचे जेष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला असे खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील कार्यक्रमात केले आगे.


आम्ही शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उधवस्थ केले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही पवारांना जेरीस आणले, मात्र ते थोडक्यात वाचले असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. पवारांना तिथेच अडकवून ठेवत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला आणि त्यांचे सर्व बालेकिल्ले आम्ही उधवस्थ केलं असल्याचं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

Baramati Water | बारामतीचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाला, नागरिकांचा फटाके फोडून आनंदोत्सव | ABP Majha



तसचे चंद्रकांत पाटील यांनी काँगेस पक्षावर देखील टीका केली. काँगेसने बहुजन समजाला भाजपासून दूर ठेवले. भाजप हा ब्राह्मणाचा पक्ष असल्याचे लोकांच्या मनात बिंबवले गेल्याचे पाटील म्हणाले. तर वर्षानुवर्षे काँगेसने भाजप पक्षाचा बागुलबुवा उभा करुन बहुजन समाजाचे नुकसान केले असे म्हणत काँग्रेसच्या नितीवर पाटील यांनी टीका केली.

सांगलीतील हिंदकेसरी पै मारुती माने पुतळा अनावरण कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीरदादा गाडगीळ , आदर्श सरपंच भीमराव माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Sharad Pawar | नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अवमान? | नवी दिल्ली | ABP Majha