Chandrakant Patil On Constitution Amendment : देशात विरोधकांकडून भारतीय जनता पक्ष (BJP) देशातील संविधान बदलण्याच्या (Constitution Amendment) तयारीत असल्याचं सांगितल जात आहे. याबाबत भाजप नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारलं असता ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात हा अतिशय आवडता आरोप आहे. संविधान कधीही बदलता येत नाही. त्यात दुरुस्ती करता येते. आत्ता पर्यंत संविधानात 106 वेळा दुरुस्ती झाली आहे. यातील बहुतांश दुरुस्ती या काँग्रेसच्या (Congress) काळात झाल्या आहे. यात बरोबर होते की, चुकीचे हा विषय नाही. अलीकडे मोदीजी यांनी दोन दुरुस्त्या केल्या. दुरुस्ती म्हणजे जे नव्हत ते आणलं आहे. मोदीजी यांनी 26 नोव्हेंबर रोजी घटना दिवस म्हणून साजरा करायला सुरवात केली. विरोधकांकडून होत असलेले आरोप हे जुने झाले असून, मी यावर डिबेट करायला देखील तयार आहे, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाटील यांनी अभिवादन केलं यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक उपकार आपल्यावर आहेत. संपूर्ण देशाला त्यांनी दिलेली घटना फार मोठी देणगी आहे. पुढचे हजार वर्ष घटनेचा मूळ भाव बदलावा लागणार नाही. जगामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. बाबासाहेबांमुळेच मोदीजींसारखे चहा वाल्याच्या घरात जन्म घेणारे पंतप्रधान झाले असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केलं.
गोळीबार झाला असेल तर पोलीस तपास करतीलच...
सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, घटना घडलेली असेल तर ती चुकीचीच आहे. 2014 पासून 24 पर्यंत एकही जातीय दंगा देशात झाला नाही. एकही बॉम्बस्फोट या देशात झालेला नाही. सर्वसामान्य लोकांनाही कळतं आहे. जर गोळीबार झालं आहे तर पोलीस याचा तपास करतील. पायाखालची वाळू घसरली की, घोषणा दिल्या जातात. जेव्हा एनडीएने घोषणा दिली की आपकी बार तेव्हा काँग्रेसनेच घोषणा दिली 400 पार म्हणून, फिर एक बार चारसो पार मोदी की गॅरेंटी असल्याचं यावेळी पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :