Rain in Maharashtra : वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने  (India Meteorological Department) वर्तवली आहे. महाराष्ट्रात 21 एप्रिलपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. पश्चिमी चक्रवातामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे 21 एप्रिलपासून दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून  देण्यात आला आहे.  


कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 21 एप्रिलपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यासह तळकोकणाला या वादळी वाऱ्याचा अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  






हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातही 21 एप्रिलपासून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणीतही पावसाची शक्यता आहे. 


विदर्भात उष्णतेची लाट
दरम्यान, 21 एप्रिलपासून राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असला तरी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील चंद्रपूर आणि अकोल्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तर  उद्यापासून म्हणजे 20 एप्रिलपासून तापमानात घट होणार आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या विदर्भाला थोडास दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  


महत्वाच्या बातम्या


खिशातच मोबाईल पेटला, वाढत्या तापमानामुळे स्फोटाचा अंदाज


Mumbai : ध्वनी प्रदुषण आणि लाऊडस्पीकर संदर्भात हायकोर्टात अवमान याचिका, तातडीनं सुनावणीस हायकोर्टाचा नकार, 14 जूनला सुनावणी