पुणे : केंद्र सरकारनं परिवहन करांमध्ये केलेल्या वाढीविरोधात प्रवासी आणि माल वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या आहेत. 31 जानेवारीला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेत पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत 31 जानेवारी रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहन नोंदणी, शिकाऊ चालक परवाना यासह सर्वच करांमध्ये मनमानी पद्धतीनं वाढ करण्यात आली आहे. या वाढीविरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं बाबा आढाव यांनी सांगितलं.
चक्का आंदोलनामध्ये राज्यभरातील रिक्षा, टॅक्सी, खासगी बसेस, ट्रक, टेम्पो आणि टँकर असे सर्वच वाहतूकदार सहभागी होणार असल्याचंही बाबा आढाव यांनी स्पष्ट केलं आहे.