मुंबई: सध्या तुरूंगाची हवा खाणाऱ्या छगन भुजबळांवर आता नवीन संकट ओढवलं आहे. ईडीनं छगन भुजबळांच्या 22 मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.


 

नाशिक आणि मुंबईमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भुजबळ्यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. त्यामध्ये दादरमधील साईकुंड इमारत आणि नाशिकमधल्या भुजबळ वायनरीच्या संपत्तीचा समावेश असल्याचं समजतं आहे. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत भुजबळ कुटुंबियांचं नाशिक आणि मुंबईतल्या राहत्या घरावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, भाजपच खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

 

सध्या छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगाची हवा खात आहेत.