मुंबई: मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा तब्बल १४२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटी, एलटीटी, दादर व पुणे ते करमाली, सावंतवाडी, रत्नागिरी दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगली सोय झाली आहे.


- ०११८७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी एसी डबलडेकर गाडी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी सुटणार असून रत्नागिरीला दुपारी १ वाजता पोहचणार आहे.

- तर परतीच्या प्रवासासाठी ०११८८ रत्नागिरी- ते लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे.

- या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली रोड आणि संगमेश्वर या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.

- ०१४४५ सीएसटी-करमाली विशेष गाडी (२४फेऱ्या-वन वे) १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून करमाळीला दुपारी २ वाजून ३० मिनिटाने पोहचणार आहे.

- दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापुर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी, मडुरे आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.