मुंबई : स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराष्ट्राच्या आराध्य दैवाताची राज्य, देशासह जगभरात शिवजंयती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा पाळणा जोजवला गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवनेरीवर शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे देखील यावेळी हजर होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास व्हिडीओ पोस्ट करुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीतून ट्वीट करुन, शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.


शरद पवार यांनी ट्वीट करुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त ट्वीट केला.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा.


ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


वीरेंद्र सेहवाग यांनीही शिवजयंतीनिमित्त ट्वीट केला.


महानायक अमिताभ बच्चन यांनीही मराठी भाषेतून ट्वीट करुन शिवजयंतीनिमित्त ट्वीट केले आहे.


सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे म्हणत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शिवजयंतीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या.