Muharram Banekar Tabut : जगातल्या अनेक देशांबरोबरच भारतातही मोहरम (Muharram) मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यासोबतच पुण्यातही मोहरम साजरा करण्याची मोठी परंपरा आहे. मोहरम साजरा करताना ताबुताची मिरवणूक काढली जाते. पेशवेकालीन वस्ताद बाणेकर ताबूत हा पेशवे काळापासून बाणेकर तालीम गुरुवार पेठ गौरी आळी येथे बसतो. या ताबूताला पेशव्यांचा मान आहे हा ताबूत डावी उजवीसाठी खूप प्रसिद्ध आहे. पेशवेकालापासून डावी उजवी ही होत असे.
'डावी उजवी' म्हणजे नेमकं काय?
दोन ताबूत एकमेकांसमोर येऊन एकमेकांना सलामी देणे म्हणजे डावी उजवी. पेशवेकालापासून वस्ताद बाणेकर ताबूत आणि छोटा शेक सल्ला दर्गा ताबूत या दोन ताबूतांची डावी उजवी होत असे. या ताबूतांच्या सलामी( डावी उजवी) मध्ये काही रंजकता यावी म्हणून पेशव्यांनी एक कल्पना सुचवली. जेव्हा दोन्ही ताबूत सलामी देण्यासाठी एकमेकांसमोर येतील तेव्हा एक निशाणी त्यांच्यासमोर ठेवण्यात येईल. सलामी देता देता ज्या ताबूत वाल्यांनी निशाणी पळून नेली. त्या ताबूत वाल्यांना पेशवाईची निशाणी आणि मान देण्यात येईल आणि शनिवार वाड्यासमोर त्या ताबूत ला तोफांची सलामी देण्यात येईल. तेव्हा त्या डावी उजवीच्या खेळामध्ये वस्ताद बाणेकर ताबूत वाल्यांनी ती निशाणी पळून आणली आणि पेशवाईचा मान मिळवला. जेव्हा विसर्जनासाठी हा ताबूत शनिवारवाड्या समोरून जात असे तेव्हा या ताबूताला पेशव्यांची तोफांची सलामी मिळत असे. डावी उजवी ही पूर्वीच्या ग्लोब टॉकीज (आत्ताचे श्रीनाथ टॉकीज) च्या समोर होत असायचं.
जातीय सलोखा बिघडू नये म्हणून डावी उजवी परंपरा बंद
पेशवेकालापासून ते 35 ते 38 वर्षांपूर्वी पर्यंत ही डावी उजवी व्हायची पण कधीही या डावी उजवीत छोटा शेख सल्ला ताबूतला निशाणी पळून नेण्यात यश आले नाही. कालांतराने गणपती आणि मोहरम एकत्र आल्यामुळे जातीय सलोखा बिघडू नये म्हणून डावी उजवी ही पेशवेकाली परंपरा बंद करण्यात आली होती. आजपर्यंत ही परंपरा बंद आहे. या ताबुताला हिंदू मुस्लिम एकतेचा खूप मोठा वारसा आहे. खूप मोठ्या संख्येने हिंदू बांधव ताबूतच्या मिरवणूकमध्ये सामील होतात. हा हिंदू मुस्लिम एकतेचा वारसा हा पेशव्या काळापासून चालत आला आहे.
लोकमान्य टिळकही मिरवणुकीत सामील व्हायचे...
पूर्वी ब्रिटिश काळात स्वतः ब्रिटिशांविरुद्ध सगळा समाज एक व्हावा म्हणून स्वतः लोकमान्य टिळक हे ताबूतांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होत व्हायचे. पेशवेकालापासून हा ताबूत बसवण्याची परंपरा आहे. पण कोरोना काळात ही परंपरा खंडित झाली. सामाजिक भान ठेवून कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ताबूत न बसवण्याचा निर्णय ताबूत अध्यक्ष सलीम बाणेकर यांनी घेतला होता. 2023 या वर्षापासून परत एकदा पेशवेकालीन ताबूत बसवण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. वस्ताद बाणेकरांची ही सहावी पिढी आहे आता ताबूत बसवते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :